(पुणे)
ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांनी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अतिशय मोजक्या लावण्यांपैकी ‘राजसा जवळी जरा बसा’ या लावणीवर गुलाबबाई संगमनेर यांनी अदाकारी करावी अशी इच्छा खुद्द लता दीदींनी व्यक्त केली होती. गुलाबबाईंनीही लतादीदींचा शब्द प्रमाण मानून या लावणीवर तितकीच दर्जेदार अदाकारी केली होती.
सुप्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनात गुलाबबाई संगमनेरकर यांनी गायलेल्या अनेक लावण्या त्याकाळी आकाशवाणीवरील कामगार सभेत प्रसारित व्हायच्या. त्यांचा दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या ‘विठाबाई नारायणगावकर’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.