(मुंबई/किशोर गावडे)
घरात लहान मुलीला पाठवून पिण्याच्या पाण्याची मागणी करत सोन्याचे कानातले झुमके चोरणाऱ्या एका लहान मुलींसह तीच्या आईला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी कोपर खैरणे सेक्टर ८ रुम नंबर २६६ येथे घडली.
भिक मागण्यासाठी घरात लहान मुलीला पहिल्या मजल्यावर चोरी करण्यासाठी पाठवून त्या मुलीची आई तळमजल्यावर बाहेर पाळत ठेवून होती. त्याचक्षणी कोपरखैरणे पोलिस मित्र मंडळाचे पदाधिकारी रमेश तानाजी सकपाळ यांची संशयित महिलेवर नजर जाताच ती क्षणभर घाबरून गेली. त्यांचक्षणी बाजूच्या घरातून एक लहान मुलगी लगबगीने बाहेर पडत असल्याचे रमेश सकपाळ यांनी पाहिले. इतक्यात मुलीच्या आईने मुलीला हाक मारली. ती पळून जाताच शेजारच्यांनी महिलेला पकडून ठेवले. यावेळी तिच्या कमरेवर छोटं बाळ होतं.
एका शेजारच्या मुलीने पाठलाग करून चोरी करणाऱ्या मुलीला अखेर पकडले. लाल रंगाच्या डबीत असलेले सोन्याचे दोन झुंबके आढळून आले. सकपाळ यांनी तातडीने कौपरखैरणे पोलिसांना घटना स्थळावर घडलेली घटना सांगितली. चोरी झालेले दागिने त्या चोरी करणाऱ्या महिलेच्या मुलीच्या झोळीतून ताब्यात घेतले व श्रीमती भोसले यांच्या उपस्थितीत मुद्देमाल त्यांना पोलिसांच्या समक्ष परत करण्यात आला.
याकामी पोलिस मित्र नितीन हिंगे मामा व विष्णु शिंदे यांनी मोलाची मदत केली. जनतेने सतर्क राहून प्रसंगी आपणही साध्या वेशातील पोलिसच आहोत, ही भावना मनात ठेऊन अशा गोष्टी घडू नयेत, म्हणून जनजागृती होणे आवश्यक आहे असे कळकळीचे आवाहन रमेश तानाजी संकपाळ यांनी केले आहे. कोपरखैरणे पोलीस मित्र मंडळाने दाखवलेल्या चातुर्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.