शासनाने कोविडची परिस्थिती बघून प्रत्येक जिल्ह्याला निर्बंधांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. रत्नागिरी जिह्यात कडक निर्बंध बाबत आज जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध किती कडक करायचे किंवा काय निर्णय घ्यायचा याबाबत येत्या दोन तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.