(देवरुख/प्रतिनिधी)
देवरुख येथील ललीत कला ॲकॅडमीच्या प्राचार्य नृत्यअलंकार सौ. शिल्पा मुंगळे यांना ओरिसा सरकारचा नृत्य शिरोमणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंटरनॅशनल उमंग डान्स फेस्टिवल ओरीसा सरकारने आयोजित केला होता.या महोत्सवात महाराष्ट्रातील देवरुखच्या नृत्य अलंकार सौ. शिल्पा मुंगळे यांची दखल घेतली गेली.
सौ.शिल्पा मुंगळे या कथ्थक नृत्यासाठी प्रसिद्ध आहेत.मनिषा साठे (पुणे ) व मनिषा जोशी ( सोलापूर ) या त्यांच्या गुरु आहेत. आजवर मुंगळे यांनी कलापर्ण पुरस्कार, गुरुवर्य सन्मान, नाट्य कलाश्री पुरस्कार मिळवले आहेत. अखंड घुंघरुनाद हा विशेष कार्यक्रम गाजला आहे. कथ्थक नृत्यामध्ये त्यांनी अनेक कलाकार घडवले आहेत. नृत्य शिरोमणी पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.शिल्पा मुंगळे यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.