(जीवन साधना)
श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. प्रभु श्रीराम सत्यवचनी, एकपत्नीव्रत व परम दयाळू होते. तर प्रभू श्रीराम यांना पितृवचन, मातृवचन, एकवचनी आणि आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. राम नावातच अपरिमित शक्ती आहे. त्यांचे नावाचे दगड पाण्यात बुडाले नाही. त्यांनी सोडलेले अमोघ बाण रामबाण अचूक मानले गेले, तर त्यांच्या मंत्राच्या शक्तीतही अद्भुत असे सामर्थ्य आहे. श्रीराम यांचे काही मंत्र कींवा त्या मंत्रांचा, परिणामानुसार एक मंत्र देखील जपल्यास भक्तांच्या इच्छा हमखास पूर्ण होतात, असे मानले गेले आहे.
‘राम’
हे मंत्र स्वत:मध्ये पूर्ण असून शूची-अशूची अवस्थेत जपू शकता. याला तारक मंत्र म्हणतात.
‘रां रामाय नम:’
सकाम जपत असलेले हे मंत्र राज्य, लक्ष्मी पुत्र, आरोग्य आणि विपत्ती नाश या साठी प्रसिद्ध आहे.
‘ॐ रामचंद्राय नम:’
क्लेश दूर करण्यासाठी प्रभावी मंत्र
‘ॐ रामभद्राय नम:’
कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
‘ॐ जानकी वल्लभाय स्वाहा’
प्रभू कृपा प्राप्तीसाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी जपावे.
‘ॐ नमो भगवते रामचंद्राय’
विपत्ती-आपत्ती निवारणासाठी जपावे.
‘श्रीराम जय राम, जय-जय राम’
सर्वोत्तम कधीही जपण्यायोग्य मंत्र.
श्रीराम गायत्री मंत्र ‘ॐ दशरथाय नम: विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।’
सर्व संकट नष्ट करण्यासाठी आणि ऋद्धी-सिद्धी देणारे मंत्र मानले गेले आहे.
‘ॐ नम: शिवाय’, ‘ॐ हं हनुमते श्री रामचंद्राय नम:।’
या मंत्रामुळे अनेक कार्यांमध्ये यश मिळतं.
‘ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:’
शत्रू शमन, न्यायालय, खटला इतर समस्यांपासून मुक्ती देतं.
सर्वसाधारणपणे हनुमानाचे मंत्र उग्र असतात. महादेव आणि राम मंत्रासोबत जपल्याने त्यांची उग्रता नाहीशी होते. रामरक्षास्तोत्र, सुंदरकांड, हनुमान चालीसा, बजरंग बाण इतर जपून अनुष्ठान रूपात लाभ प्राप्त करता येऊ शकते असे सांगितले जाते.