[ नवी मुंबई ]
राज्यातील विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी दिली.
संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या
ठाणे : कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे-५, भिवंडी – ३१, मुरबाड-३५ आणि शहापूर- ७९, पालघर डहाणू-६२, विक्रमगड ३६, जव्हार ४७, वसई – ११, मोखाडा – २२, पालघर- ८३, तलासरी ११ आणि वाडा ७०,
रायगड : अलिबाग-३, कर्जत – २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर-४, महाड १, माणगाव ३ आणि श्रीवर्धन- १,
रत्नागिरी : मंडणगड-२, दापोली-४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर – ३, रत्नागिरी-४, लांजा – १५ आणि राजापूर- १०,
सिंधुदुर्ग : दोडामार्ग- २, देवगड-२,
नाशिक : इगतपुरी-५, सुरगाणा ६१, त्र्यंबकेश्वर ५७ आणि पेठ ७१,
नंदुरबार : अक्कलकुवा – ४५, २५, तळोदा – ५५ आणि नवापूर-८१,
पुणे : मुळशी-१, मावळ – १,
सातारा :जावळी ५, पाटण-५ आणि महाबळेश्वर- ६,
कोल्हापूर : भुदरगड -१, राधानगरी-१,
आजरा -१ आणि चंदगड- १, अमरावती : चिखलदरा – १,
वाशिम : वाशिम – १, नागपूर: रामटेक-३,
भिवापूर- ६ आणि कुही-८, वर्धा : वर्धा २, आमी आव ७,
चंद्रपूर : भद्रावती २ चिमूर-४, मूल- ३, जिवती – २९, कोरपणा २५, राजुरा ३० आणि ब्रह्मपुरी – १,
भंडारा : तुमसर- १, भंडारा – १६, पवनी – २ आणि साकोली : -१,
गोंदिया देवरी १, गोरेगाव- १, गोंदिया – १, सडक अर्जुनी-१ आणि अर्जुनी मोर- २,
गडचिरोली : चामोर्शी-२, आहेरी-२, धानोरा-६, भामरागड-४, देसाईगंज-२, आरमोरी – २, एटापल्ली- २ आणि गडचिरोली- १, एकूण १,२६६.