[ नवी मुंबई ]
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा (७०) दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. प्रकृती अस्वास्थतेमुळे औषधोपचारासाठी जामीन देण्याची विनंती करणारा नवलखांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन लेखक आणि पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सचे माजी सचिव, गौतम नवलखांसह इतर काही जणांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. नवलखांना २८ ऑगस्ट २०१८ रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून नवलखा तळोजा कारागृहात आहेत. नवलखा यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना औषधोपचारासाठी जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती त्यांच्याकडून न्यायालयाला करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.