[ रत्नागिरी / प्रतिनिधी ]
रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या “कांचन डिजिटल”तर्फे आयोजित “भव्य गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धे”चा निकाल आज 5 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत मिरजोळे-पाडावेवाडीतील राहुल पाडावे यांच्या घरातील “संत गोरा कुंभार देखाव्या”ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तर जयगड-सड्येवाडीतील संदीप मेस्त्री यांच्या घरातील “दहीहंडी देखावा” द्वितीय, तर रत्नागिरी एम.आय.डी.सी.मधील संतोष माचकर यांच्या घरातील “कोंकण रेल्वे देखाव्या”ला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या “कांचन डिजिटल”तर्फे आयोजित या स्पर्धेसाठी “श्री निरीपजी को. ऑ. क्रेडिट सोसायटी लि.” आणि “भंडारी युवा प्रतिष्ठान-रत्नागिरी” यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. गेले 3 दिवस या स्पर्धेतील निवडक स्पर्धकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. भंडारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश नार्वेकर, ऍड. साईजित शिवलकर, फोटोग्राफर कांचन मालगुंडकर आणि गायक कलाकार अभिजीत नांदगावकर यांनी स्पर्धेचे कसून परीक्षण केले.
यंदा स्पर्धेला तालुकास्तरातून भरभरून प्रतिसाद लाभला. तालुका व जिल्ह्यातील मिळून 112 हून अधिक स्पर्धक गणेशभक्तांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. या सर्व स्पर्धकांचे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी आभार मानले आहेत.
“कांचन डिजिटल गणेशोत्सव सजावट स्पर्धा” ही तालुक्यातील अत्यंत दर्जेदार, पारदर्शक निकाल व भव्यदिव्य अशी ख्याती प्राप्त स्पर्धा आहे. या स्पर्धेचा लक्षणीय पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता जयेश मंगल कार्यालय-माळनाका येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेसाठी श्री निरपजी कॉ. ऑ. क्रेडिट सोसायटी लि. चेअरमन भुपेश मोरे, ग्रामदैवत भैरी देवस्थान अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, भंडारी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष निलेश नार्वेकर, उद्योजक प्रसन्न आंबुलकर, उद्योजक मुकेश गुंदेजा, मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजुशेठ किर, ऍड. मलुष्टे सर, ओंकार रहाटे, रत्नागिरी व्यापारी संघटना शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे, मूर्तिकार दीपक चव्हाण, मूर्तिकार आशिष संसारे, संपर्क युनिक फाऊंडेशन अध्यक्ष शकील गवाणकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच यावेळी रत्नागिरीतील प्रसिद्ध नृत्यांगना प्रणाली तोडणकर यांच्या नृत्यार्पण संस्थेतर्फे भरतनाट्यम् नृत्य सादरीकरणही करण्यात येणार आहे.
■ स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :
प्रथम – राहुल पाडावे ( मिरजोळे-पाडावेवाडी, “संत गोरा कुंभार देखावा.
■ विशेष उल्लेखनीय :
◇ दीपक मेस्त्री (मिरजोळे-लक्ष्मीकांत वाडी, नरसिंह अवतार देखावा)
◇ अनिल गोताड (कोतवडे- गावणवाडी, साईबाबा चमत्कार देखावा)
◇ चारुदत्त धावलकर ( गावखडी, गणेशोत्सव जनजागृती देखावा)
◇ आशिष वाडकर (मिरजोळे, निसर्ग संपन्नता देखावा)
■ उत्तेजनार्थ :
◇ जीवन कोळवणकर (कुवारबांव, व्यासमुनी-महाभारत देखावा)
◇ सुयोग बाणे (पावस बाजारपेठ, जेजुरीगड आरास)
◇ संकेत नांदगावकर (आडिवरे, हर हर महादेव देखावा)
◇ रमेश माचकर (शिरगाव-सुतारवाडी, संत तुकाराम महाराज वैकुंठगमन देखावा)
◇ रजनीश वासावे ( गावडे आंबेरे, मच्छिंद्रनाथ जन्मगाथा)
◇ रजनीकांत मिरजूळकर (गावडे आंबेरे, केदारनाथ मंदिर देखावा)
◇ साईराज वाडकर (मिरजोळे, कृष्णलीला देखावा)
◇ तुषार लाखण (समर्थ नगर-नाचणे, इंडियन आर्मी)
◇ मयूर भितळे (सोमेश्वर, पावनखिंड)
■ गणेशोत्सव स्पर्धेची पारितोषिके :
पहिलं बक्षीस : 10 हजार रुपये व ट्रॉफी
दुसरे बक्षीस : 5 हजार रुपये व ट्रॉफी
तिसरं बक्षीस : 3 हजार रुपये व ट्रॉफी
विशेष उल्लेखनीय : 2 हजार रुपये व ट्रॉफी
उत्तेजनार्थ : ( प्रत्येकी 500/- रुपये व ट्रॉफी)