(सावंतवाडी/किशोर गावडे )
रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस प्रशासनात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांनी थेट नागरिकांशी सुसंवाद निर्माण केला होता. अनेक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली असे सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक वसंत जाधव यांचे अल्पशा आजाराने सावंतवाडी येथे रविवारी निधन झाले. मृत्यू समयी ते 69 वर्षांचे होते.
पोलिस खात्यात हवालदार, जमादार, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरक्षक या पदावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी सेवा बजावून २००९ साली निवृत्त झाले होते. व गेल्या काही वर्षांपासून कर्करोगासारख्या असाध्य आजाराने ग्रासलेले होते. कुडाळ येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे.