कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शासनाने ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केल्यानंतर नागरिकांना कोविड लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांतर्गत गावातील ५ टक्के लोकांनाही लस मिळत नाही, अशी बाब समोर येत आहे. तरी या आरोग्य केंद्रामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन सदस्य अरविंद चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यानुसार वावे, लोटे, तिसंगी, शिव, फुरूस, कोरेगाव, तळे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चिपळूण व इतर ठिकाणांहून अनेक लोकं कोविड लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. पण इतर ठिकाणांहून लसीकरणासाठी आलेल्या लोकांमुळे या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची अँन्टीजन टेस्ट करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच आॅनलाइन पद्धतीमुळे येथील आरोग्य केंद्राच्या गावातील 5% लोकांनाही कोविड मिळत नाहीत. त्यामुळे येथील स्थानिक लोकांना ५० टक्के आॅफलाइन पद्धतीने कोविड लस देण्यात यावी, असेही म्हटले आहे.