जगभरातील अनेक देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरिएंट हा भारतात (India) सापडलेला व्हेरिएंट असल्याची पुष्टी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहीती जाहीर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोना रुग्ण वाढीमागे B.1.617 व्हेरिएंट (B.1.617 variants) जबाबदार आहे. विशेष म्हणजे भारताव्यतिरिक्त या व्हिरिएंटमधील सर्वाधिक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळून आले आहेत. मार्च 2020 मध्ये भारतात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. यापूर्वी ब्रीटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका देशात आढळून आलेल्या व्हेरिएंटचा या यादीमध्ये समावेश होता. हा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचे मानले जाते. शिवाय ४४ देशांमध्ये प्रादुर्भाव झाल्याचेही पुढे आले आहे.