(मुंबई)
माजी परिवहन परब यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर आरोप असलेल्या मुरुड येथील साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा कोस्टल झोन मॉनिटरिंग कमिटी यांना गुरुवारी राज्य शासनाने दिले आहेत, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या आठवड्यात या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी केंद्राच्या तज्ज्ञ समितीचे हे रिसॉर्टवर कारवाई करून तोडण्याची शिफारस केली होती. मिलिंद नार्वेकर यांचा बंगलो तुटला, आता नंबर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पडणार असे ट्वीट सोमय्या यांनी सोमवारी केले होते. यासोबत त्यांनी २२ ऑगस्ट रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून आलेले पत्रही ट्विट केले होते. महाराष्ट्र राज्याचे कोस्टल झोन एथॉर्टी सेक्रेटरी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला हे पत्र देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्रालयाने गुरुवारी दुपारी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना अनिल परब यांचे दापोली येथील अनधिकृत, बेकायदेशीर साई रिसॉर्ट आणि सी कोंच रिसॉर्ट पाडण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती सोमय्या यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर
या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी किरीट सोमय्या दापोली दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बेकायदा साई रिसॉर्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमय्या यांनी या संदर्भात सांगितले की, माजी मंत्री परब यांच्या रिसॉर्टची फाईल आता पर्यावरण मंत्रालयाकडे आलेली आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश आजच पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. पुढच्या आठवड्यात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हे रिसॉर्ट सार्वजनिक बांधकाम विभाग पाडणार की जिल्हाधिकारी कार्यालय? टेंडर काढून ते पाडणार का? की अन्य कसे ? याबाबतचा निर्णय घेणार आहेत, अशी माहिती दिली