(क्रीडा)
फुटबॉलची जागतिक संघटना फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (फिफा) बंदी लादली होती. त्यामुळे जोवर ही बंदी उठविली जात नाही, तोवर भारतीय फुटबॉल संघ कोणतेही सामने खेळू शकणार नव्हता. अखेर भारतीय फुटबॉल संघावर घातलेली बंदी उठविण्यात आली आहे. फिफाच्या समितीमधील सदस्यांनी २५ ऑगस्टपासून ही बंदी उठविल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असून, यंदाचा महिला अंडर १७ विश्वचषकही आता भारतातच होणार आहे.
महिलांचा अंडर १७ वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबरमध्ये भारतातच होणार होता. मात्र, बंदीमुळे तोदेखील फिफाने हिसकावून घेतला होता. एकीकडे क्रिकेटद्वारे अवघ्या जगावर राज्य करीत असलेल्या भारतासाठी फुटबॉलमध्ये तो काळा दिवस उजाडला होता. मात्र, आजचा सोनेरी दिवस उजाडला असून, क्रीडाप्रेमींसाठी ही सोनेरी पहाट आहे.
तिस-या पक्षाने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचे कारण देत फिफाने काही दिवसांपूर्वीच हा कठोर निर्णय घेतला होता. भारतीय महासंघावरील बॅन आता तात्काळ प्रभावाने लागू होत असल्याचे फिफाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे बंदी उठविण्याचा निर्णयही तात्काळ प्रभावाने लागू झाल्याचेही फिफाने जाहीर केले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. सदर निवडणूक उद्या २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.