(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडास्पर्धा (स्पोर्टेक्स २०२२) दि. २० व २१ ऑगस्ट २०२२ रोजी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पार पडल्या. बुध्दीबळ, टेबल-टेनिस व बॅडमिंटन या इनडोअर क्रीडा प्रकारांचा यात समावेश होता. स्पर्धेत विद्यापीठाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या २० महाविद्यालयातील ३०० पुरूष व १५० महिला खेळाडू सहभागी झाले होते. दोन दिवस अतिशय खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात या स्पर्धा खेळविण्यात आल्या.
स्पोर्टेक्स २०२२ च्या स्पर्धत त्रयस्थ पंचांनी पंचगिरी पार पाडली. क्रीडास्पर्धेचे उदघाटन विद्यापीठाचे क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम संचालक डॉ. विठ्ठल नाईक यांनी केले, तर यावेळी मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे, विद्यापीठ क्रीडा अधिकारी श्री. संदीप थोरात, बुध्दीबळ खेळाचे राष्ट्रीय पंच श्री. सुभाष शिरधनकर आणि मत्स्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दबीर पठाण, महाविद्यालयाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, सर्व सहभागी महाविद्यालयाचे प्राध्यापक संघ व्यवस्थापक, स्पर्धक खेळाडू, मत्स्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी चे सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. स्पोर्टेक्स २०२२ च्या यशस्वी आयोजनाबद्द्ल महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी सर्वांचे आभार मानले त्याचबरोबर या स्पर्धा आयोजशनाची जबाबदारी मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी ला दिल्याबद्दल डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. उत्तम महाडकर, विद्यापीठाचे क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम संचालक डॉ. विठ्ठल नाईक यांचे विशेष आभार मानले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विद्यापीठाचे क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम संचालक डॉ. विठ्ठल नाईक, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे, विद्यापीठ क्रीडा अधिकारी श्री. संदीप थोरात, प्राध्यापक, सर्व सहभागी महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक, विद्यार्थी खेळाडू यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
स्पोर्टेक्स २०२२ चा निकाल:
बुध्दीबळ (मुले):
▪️विजेते : कृषी महाविद्यालय, दापोली, रत्नागिरी
▪️उपविजेते: शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते, रत्नागिरी
बुध्दीबळ (मुली):
▪️विजेते : कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी
▪️उपविजेते: कृषी महाविद्यालय, दापोली, रत्नागिरी
टेबल-टेनिस (मुले):
▪️विजेते : कृषी महाविद्यालय, दापोली, रत्नागिरी
▪️उपविजेते : उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, सिंधुदुर्ग
टेबल-टेनिस (मुली):
▪️विजेते : कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली, रत्नागिरी
▪️उपविजेते: शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते, रत्नागिरी
बॅडमिंटन (मुले):
▪️विजेते : कृषी महाविद्यालय, दापोली, रत्नागिरी
▪️उपविजेते: वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, रत्नागिरी
बॅडमिंटन (मुली):
▪️विजेते : उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी
▪️उपविजेते: शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते, रत्नागिरी