(राजापूर)
राजापूर तालुक्यातील श्री घाटोबा गोविंदा पथक, आवळीचीवाडी तर्फे दहीहंडीचे औचित्य साधून जेष्ठ महिलांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. वाडीतील ज्या महिलांनी आपल्या वयाची ६० वर्षे पूर्ण केली, अशा एकूण २५ जेष्ठ महिलांचा भव्य सन्मान आवळीचीवाडी येथील दहीहंडी उत्सव स्थळी कशेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक श्री.वसंत पाटील यांच्या उपस्थित करण्यात आला.
श्री घाटोबा गोविंदा पथक, आवळीचीवाडी हे दहीहंडी उत्सव दरम्यान अनेक उपक्रम साजरे करतो, या वर्षीही या गोविंदा पथकाच्या वतीने नावीन्यपूर्ण विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाडीतील २५ जेष्ठ महिलांचा आदरपूर्वक सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. उतरत्या वयात आपली आदरपूर्वक आठवण करून आमचा सन्मान केला. हा क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. कदाचित रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गोविंदा पथक असेल ज्यांनी दहीहंडी उत्सवात जेष्ठ महिलांचा आदरपूर्वक सन्मान करण्याचा कार्यक्रम केला असेल. इतक्या उतरत्या वयात आमची दखल या गोविंदा पथकाने घेतली, आम्ही ज्या वाडीत घडलो त्या वाडीतीलच मुलांनी आमचा सन्मान केला हे आमच्या साठी भाग्य आहे.अशी भावना सन्मानमूर्तींनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला गावचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री.शशिकांत वारिशे, पोलिस पाटील श्री.प्रमोद सुतार, श्री.राजन आगवेकर, वाडीचे माजी सचिव श्री.सुशांत राडये, माजी उपसचिव श्री.आदित्य राडये, श्री घाटोबा गोविंदा पथकाचे अध्यक्ष श्री.गौरव पेटावे, श्री.भरत धावडे, वाडीतील जेष्ठ नागरिक श्री.गोविंद राडये, श्री.संजय राडये, श्री.अर्जुन माळी, श्री.धोंडू धरणकर, श्री. अनंत राडये, श्री.दशरथ राडये श्री.राजा पेटावे, श्री.अभिषेक राडये,श्री.मनोज भोसले, श्री.दिवाकर भोसले, तसेच सन्मानमूर्तींचे नातेवाईक, वाडीतील ग्रामस्थ, गोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.