(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ गणपत जाधव यांची निवड करण्यात आली.
सिद्धार्थ जाधव एस.टी. महामंडळाच्या खात्यात कंडक्टर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. शिवाय त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांनी बौद्ध समाज परिवर्तन समिती तेरा गाव संघटना जाकादेवी खालगाव या संघटनेचे सचिव म्हणून अनेक वर्षे काम पाहिले.
सामाजिक व शैक्षणिक कार्याची आवड लक्षात घेऊन ओरी ग्रामपंचायत येथे झालेल्या ग्रामसभेत सिद्धार्थ जाधव यांची तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सिद्धार्थ जाधव यांचे सरपंच उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष, ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.