लोकप्रिय मोटरसायकल निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड लवकरच भारतात 4 नवीन बाइक्स लाँच करणार आहे. कंपनी रॉयल एनफिल्ड 4 नवीन बाइक्स भारतात लाँच करणार, कंपनी ३५०सीसी आणि ६५०सीसी बाइक रेंज वाढवणार. या बाइकमध्ये न्यू जनरेशन क्लासिक ३५०, रॉयल एनफिल्ड ६५० सारख्या बाइक्सचा समावेश.
रॉयल एनफिल्ड भारतातील लोकप्रिय दुचाकी वाहनांचा ब्रँड आहे. हा ब्रँड आता आपल्या ३५०सीसी आणि ६५०सीसी बाइक रेंज वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय बाजारात अनेक नवीन बाइक्स आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये न्यू जनरेशन क्लासिक ३५०, रॉयल एनफिल्ड हंटर ३५० सह अनेक बाइक्सचा समावेश आहे. या बाइक्सविषयी जाणून घेऊया.
न्यू जनरेशन क्लासिक ३५०
कंपनी सध्या या बाइकचे टेस्टिंग करत आहे. कंपनीने अद्याप लाँचिगची तारीख जाहीर केली नसली तरीही दिवाळीच्या आधी भारतीय बाजारात ही बाइक विक्रीसाठी उपलब्ध असेल. बाइकमध्ये ३४९सीसी इंजिनचा वापर करण्यात आला आहे.
रॉयल एनफिल्ड ६५०
कंपनीने या बाइकचे देखील टेस्टिंग सुरू केले आहे. हे एक मॉर्डन क्लासिक स्टाइल व्हर्जन असेल. बाइकमध्ये ६४८सीसी पॅरलल ट्विन एअर कूल्ड इंजिन देण्यात येईल, जे ४७.६ पीएस आणि ५२ एनएम टॉर्क जनरेट करते.
रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५०
ही कंपनीची क्रूजर बाइक आहे. या बाइकचे नाव Royal Enfield Shotgun असू शकते. ही बाइक मॉडर्न स्टाइलिंग आणि स्पोर्टियर स्टांससोबत येणार आहे. यामध्ये देखील ६४९सीसी इंजिन मिळण्याची शक्यता आहे.
रॉयल एनफिल्ड हंटर ३५०
ही बाइक मॉडर्न क्लासिक स्पोर्टियर डिझाइनसोबत येणार आहे. भारतात या बाइकची टक्कर होंडा CB350 RS शी होईल. कंपनी या बाइकची ३५०सीसी सेगमेंटमध्ये विक्री करेल