जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता दुकाने वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खेडमधील पाच व्यापाऱ्यांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील प्रकाश भवरलाल जैन, बळीराम साहेबराव जाधव, शरद धोंडू चव्हाण, धनंजय दत्ताराम पणदेरे आदी व्यावसायिकांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत