(राजापूर)
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कशेळी नं. २ या शाळेमध्ये सहशालेय उपक्रमाअंतर्गत रानभाज्यांचे प्रदर्शन बुधवार दि.१० रोजी करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कशेळी गावचे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. शशिकांत वारीशे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी कशेळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सुनील जायदे, पोलीस पाटील प्रमोद सुतार, श्री. राजन आगवेकर, मुख्याध्यापिका सौ.ज्योती मुरकर, सहशिक्षिका सौ. संध्याराणी घुणके, सहशिक्षक श्री. सोमनाथ कदम, स्वयंसेवक शिक्षिका सौ.पूजा पाटील आणि सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.वारीशे यांनी फास्ट फूड व चायनीजच्या जमान्यात रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.