(रत्नागिरी)
एस.पी. हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण महाविद्यालयाच्यावतीने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढण्यात आली. मुसळधार पाऊस असूनही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत रॅलीमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
साळवी स्टॉप येथील स्विमींग टँक येथून रॅलीला सुरुवात झाली. ‘हर घर तिरंगा, वदे मातरम, हम सब एक है, भारत आमचा प्राण, तिरंगा त्याची शान, चला भारत गीते गाऊ, घरोघरी तिरंगा पाहू अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. मुसळधार पावसातही विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत होता. पारंपारिक वेशभूषा परिधान करून सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन केले. ही रॅली जे.के. फाईलपासून पुढे नवनिर्माण महाविद्यालयात विसर्जित झाली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. 11 वाजता विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. सुशिल साळवी, प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. आणेराव, प्रा. सचिन टेकाळे, प्रा. प्रकाश पालांडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत महाविद्यालयात वक्तृत्त्व, रांगोळी, प्रश्नमंजुषा, पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.