(करिअर)
इंडियन आर्मी अग्निपथ अग्निवीर महिला (फीमेल) भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आर्मीमध्ये महिला अग्निवीरांची भरती मिलिट्री पोलिसमध्ये केली जाईल. जॉइन इंडियन आर्मी वेबसाइट वर म्हटले आहे की, मिलिट्री पोलिसात महिला अग्नवीरांची भरती मेळाव्याचे नोटिफिकेशन संबंधित मुख्यालय आरटीजी झोन जारी करतील. बंगळुरू मुख्यालय आरटीजी झोन बंगलुरुमध्ये एक नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत मानेकशॉ परेड ग्राउंडवर भरती मेळावा आयोजित केला जाईल. बंगलुरु मुख्यालय आरटीजी विभागाच्या या भरती मेळाव्यात कर्नाटक, केरळ, लक्षद्वीपमधील तरुणी सामील होऊ शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर २०२२ आहे. यासाठी उमेदवारांना वेबसाइट www.Joinindianarmy.nic.in पर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. या मेळाव्यासाठी प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर १२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पाठवण्यात येतील.
हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि चंडीगडच्या महिला उमेदवारांसाठी ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान भरती मेळावा आयोजित केला जाईल. यासाठी ऑनलाइन नोंदणीकरण ९ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. सात सप्टेंबरपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिला भरतीसाठी पात्र ठरतील. उमेदवार पाच ऑक्टोबरपासून प्रवेश पत्र भारतीय लष्कराच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतील.
भारतीय लष्कार भरती २०२२
⇒ पदाचे नाव : अग्निवीर (महिला).
⇒ योजनेचे नाव : अग्निपथ योजना २०२२.
⇒ रिक्त पदे : 1000+ पदे.
⇒ अर्ज : ऑनलाइन.
⇒पात्रता : कमीत कमी ४५ टक्के गुणांसह १० वी पास प्रत्येक विषयात कमीत कमी ३३ टक्के मार्क आवश्यक.
⇒ वयोमर्यादा : कमीत कमी १७ वर्ष कमाल २३ वर्ष
⇒ उंची : १६२ सेंमी. अग्निवीर भरतीसाठी शारीरिक चाचणीसाठी ग्रुप-१ नुसार साडे ७ मिनिटात १.६ किमी धावणे आवश्यक आहे. ग्रुप-२ नुसार ८ मिनिटात १.६ किमी धावणे आवश्यक आहे. १० फूट लांब उडी व ३ फूट उंच उडी मारणे आवश्यक आहे.
⇒ मुख्यालय : पुणे (अंतर्गत राज्य महाराष्ट्र आणि गुजरात)
पुरुष अग्निवीरांप्रमाणे महिला अग्निवीरांनाही चार वर्षासाठी भरती करून घेण्यात येईल. चार वर्षानंतर केवळ २५ टक्के महिला अग्निवीरांना मिलिट्री पोलिसात कायम केले जाईल.