(क्रीडा)
जगातील अव्वल दर्जाची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स लवकरच तिच्या दमदार अशा टेनिस कारकीर्दीला अलविदा करणार असल्याचं समोर येत आहे. सेरेनाच्या निवृत्तीबद्दल तिने स्वत:च संकेत दिले आहेत. ती पुढील काही आठवड्यात निवृत्त होईल असं तिच्या एका नुकत्याच करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून समोर येत आहे.
काय म्हणाली सेरेना?
सेरेनाने पोस्ट केलेल्या फोटोत तिने लिहिले आहे की, “आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करता तेव्हा तो काळ नेहमीच कठीण असतो. माझ्या चांगुलपणाने मी टेनिसचा आनंद घेते. मात्र, आता काऊंटडाऊन सुरु झालं आहे. मला एक आई म्हणून आता जगायचं आहे.” दरम्यान सेरेनाने आई म्हणून जगण्यावर अधिक लक्ष द्यायचं या पोस्टमध्ये लिहिलं असल्याने ती लवकरच खेळातून निवृत्त होईल अशी शक्यता दिसून येत आहे.