.(रत्नागिरी)
तालुक्यातील धामणसे बौद्धवाडी येथे बौद्ध समाज परिवर्तन समिती खालगांव जाकादेवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व भीम संदेश कला झंकार मंडळ धामणसेचे संस्थापक दिवंगत वसंत काळू जाधव (गुरूजी) यांच्या 25 व्या स्मतीदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होत़े.
त्याचपमाणे भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी तालुक्याचे माजी अध्यक्ष रत्नदीप कांबळे, सुनील बाळू जाधव, भीम संदेश कला झंकार मंडळाचे अध्यक्ष सुरेश दीपाजी जाधव , पकाश कांबळे, बौद्धाचार्य विजय आयरे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी केंद्रीय शिक्षक नंदकुमार डिंगणकर, धामणसे महाविद्यालयातील भोसले सर, शिक्षिका प्रतिभा कांबळे, दीपिका कदम अश्विनी चवेकर कांबळे, आदींनी वसंत जाधव गुरूजी यांच्या आठवणींना उजाळा दिल़ा तसेच प्रशांत जाधव यांनी आलेल्या अभिवादन संदेशचे वाचन केल़े. कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी पोलीस पाटील सुरेश जानू जाधव यांनी जाधव गुरुजींच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिल़ी. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनंत जाधव यांनी केल़े तर आभार प्रदर्शन सुशील वसंत जाधव व अनिल जाधव यांनी केले.
कार्यक्रमाला खंडाळा 22 खेडी चे अध्यक्ष रजत पवार, महिला कमिटीच्या अध्यक्षा दीक्षा जाधव, संतोष जाधव, पांडूरंग कांबळे तसेच चवे, देवूड, निवेंडी, भगवतीनगर, विल्ये, नेवरे, कोतवडे, सडये आदी गावातील प्रतिष्ठीत
नागरिक उपस्थित होते.