(मुंबई)
कोकणी माणसांचे गणपती व होळी हे दोन सण जिव्हाळाचे आणि आवडीचे. मुंबई, पुण्यावरुन चाकरमानी आपल्या गावी या दोन सणांसाठी हमखास आपल्या गावी जातो. त्यामुळं सहा-सहा महिने आधी रेल्वेचं तिकिट गणपतीला गावी जाण्यासाठी बुक केले जाते. त्यामुळं काही चाकरमान्यांचे नोकरी, सुट्टी यामुळं नियोजन होत नसल्यामुळं शेवटच्या क्षणी गावी जाण्याचे ठरते, त्यामुळं त्यांना खासगी दलालाकडून तिकिट ब्लॅकच्या भावात किंवा डब्बल भावात खरेदी करावे लागले. मात्र कोकणतील चाकरमान्यांची ही गरज ओळखून आमदार नितेश राणे यांनी यावर्षीही स्पेशल मोदी ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांना वेळेत आणि पैशाची बचत करत हा गणेशोत्सव साजरा करता येणार आहे.
मागील वर्षीपासून “मोदी एक्स्प्रेस” सुरु करण्यात आली. यावर्षी सोमवारी २९ ऑगस्ट २०२२ रोजी ही विशेष “मोदी एक्स्प्रेस” सोडण्यात येणार आहे. ही एक्स्प्रेस सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून सोडण्यात येत आहे. ही तुमची हक्काची “मोदी एक्स्प्रेस” आहे’ असं भाजपा आमदार नितेश राणेंनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे.