( लांजा / प्रतिनिधी )
रांची झारखंड येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील महिला कुस्ती स्पर्धा 2022 मध्ये लांजा येथील आर्या मंगेश मोरे हीची चमकदार कामगिरी. राष्ट्रीय स्तरावर 20 वर्षाखालील 72 किलो वजनी महिला कुस्ती गटात दहावे स्थान पटकावल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
७२ किलो वजनी गटात आर्याचे 17 मुलींपैकी टॉप 10 मध्ये निवड झाली आहे. कुस्ती खेळाचा गंधही नसणाऱ्या व लांजा तालुक्यातुन प्रथमच कुस्तीचा फड गाजवणाऱ्या आर्या मोरे हीने राष्ट्रीय स्तरापर्यंत उत्तुंग भरारी घेतल्याने तीचे जील्हाभरातुन कौतुक केले जाते आहे आर्याचे प्राथमिक शिक्षण लांजा येथील ज्ञानेश्वर विद्यामंदिर व लांजा न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले आहे इयत्ता आठवीमध्ये तिने न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे प्रवेश घेतला तेव्हापासुन खेळाची आवड निर्माण झाली होती हायस्कुलचे क्रीडा शिक्षक रवींद्र वासुरकर यांनी तिची उंची, आणि ताकद यांचा विचार करून तिला विविध क्रीडा प्रकारात मार्गदर्शन केले. तिचे कौशल्य, ताकद आणि देहयष्टी यांचा दुसऱ्या खेळात कसा उपयोग होईल याबाबत हायस्कुलचे क्रीडा शिक्षक पवार यांनी विचार करुन तिला कुस्ती या खेळासाठी मार्गदर्शन केले. तेव्हापासुन आर्याची पैलवान आर्या अशी ओळख निर्माण झाली.
आर्या हीने सन 2019 साली जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आणि पुढेही खेळण्याची संधी मिळत गेली. ऑक्टोंबर 2019 मध्ये कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडास्पर्धेत ब्रॉंझ मेडल मिळाल्यावर कुस्तीची आवड आणि कुतूहल आर्याला वाटू लागलं. तिच्या या यशाने अनेक हितचिंतकांनी पालकांना तिने याच क्षेत्रात प्रगती करावी म्हणून सल्ले आणि शुभेच्छा दिल्या. मात्र त्यासाठी टेक्निक आणि योग्य त्या व्यायामाची गरज होती. त्यासाठी कोल्हापूर येथील कुस्तीचे प्रशिक्षक संदीप हरी पाटील यांच्या एन आय एस कुस्ती कोच ऍकॅडमी मध्ये आर्याला प्रशिक्षण घेतले. 2021 मध्ये रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या स्पर्धेत जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल मिळाले. मात्र त्यानंतर कोरोनामुळे क्रीडास्पर्धा झाल्याचं नाहीत त्यामुळे सहभागही घेता आला नाही. दोन वर्षे प्रशिक्षणासाठीही जाता आले नाही. मात्र आर्याने घरी ऑनलाइन अभ्यासाबरोबर आपलं आणि कुस्तीचं नातं तोडलं नाही. जिद्द आणि चिकाटीने कुस्तीचे डावपेचाचे धडे you tube वरून तसेच संदीप पाटील याच्यांशी विडिओ कॉल करून घेत राहिली. कोरोनाचे प्रमाण कमी झाले आणि पुन्हा पूर्ववत शाळा अकॅडमी सुरळीत सुरू झाली. इयत्ता दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आर्याने लांजा हायस्कुल च्या संलग्न ज्युनियर कॉलेज लांजा मध्ये अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि ज्युनियर कॉलेजच्या अनिल कांबळे या क्रीडाशिक्षकांचे आर्याला मार्गदर्शन मिळू लागले. त्यांनीही आर्याला या कुस्ती खेळासाठी मार्गदर्शन करत सराव करून घेतला.
दरम्यान तब्बल दोन वर्षांनंतर यावर्षी 2022 मध्ये झारखंड रांची येथे २० वर्षाखलील खुल्या नॅशनल रँकिंग रेसलिंग टूर्नामेंट 2022 मध्ये खेळवण्यासाठी कोल्हापूरचे कुस्ती प्रशिक्षक संदीप पाटील यांनी तयारी करून घेतली. झारखंड येथे राष्ट्रीय स्तारावर 72 किलो वजनी गटात सहभाग घेऊन आर्याची 17 मुलींपैकी टॉप 10 मध्ये निवड झाली आहे. कुस्तीचा गंध नसणाऱ्या छोट्याशा लांजा तालुक्यातून कुस्तीचा फड गाजवणाऱ्या आर्याने नॅशनलपर्यंत उत्तुंग भरारी घेऊन स्वतःबरोबर पालक, शाळा, प्रशिक्षक आणि आपल्या लांजा तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे सुद्धा नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशात तिचे कष्ट, तिची अपार मेहनत, याच बरोबर तिच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे तिचे पालक, तिला योग्य दिशेने नेण्यासाठी लाभलेले क्रीडाशिक्षक याचे मार्गदर्शन लाभल्याचे आर्या सांगते