(बर्मिंगहम)
पाकिस्तानच्या मोहम्मद इनामला धूळ चारून ‘दीपक’ ने भारताचे ‘सुवर्ण’ पदक उजळवले आहे. कुस्तीमधील तिसरे सुवर्णपदक जिंकवून दिले. बजरंग पुनिया, साक्षी मलिकनंतर भारताला हे तिसरे सुवर्णपदक कालच्या दिवशी मिळाले आहे.
भारत-पाकिस्तान भिडले की दोन्ही देशांतील चुरशीचा सामना पहायला मिळतो. तसच खेळांच्या आठव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री उशिरा दीपकने 86 किलो फ्रीस्टाइल प्रकारात त्याच्या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याला ३-० ने पराभूत केले. कुस्तीतील हे तिसरे आणि एकूण ९ वे सुवर्णपदक होते. यापूर्वी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनीही आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले होते.
बजरंगने पटकावले सुवर्णपदक
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. बजरंगने यावेळी अंतिम फेरीत ९-२ असा विजय साकारला आणि देशाला सुवर्णपदक मिळाले. भारताला कुस्तीमध्ये या स्पर्धेत मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगला ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागले नाही आणि त्याने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचे आव्हान होते. हा सामना ९-२ असा जिंकून बजरंगने सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे दुसरे आणि एकूण तिसरे सुवर्ण आहे.