कोरोना अर्थात सार्स-को व्ही-2 व्हायरस हा हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुराव्यातून सिद्ध झाले आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल अॅन्ड प्रिवेन्शन अर्थात सीडीसीने याबाबत संशोधन केले आहे. त्यांचे हे संशोधन गेल्या महिन्यात ‘द लॅन्सेट’ या सायन्स नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले होते. कोरोना हवेतून परसतो आणि त्याचे सातत्याने पुरावे संशोधकांना मिळत आहेत असे त्याच्या एका निवेदनात सांगण्यात आले होते.
आता अमेरिकेच्या सीडीसीच्या दाव्याने द लॅन्सेटच्या या मताला पृष्टी मिळाली आहे. या आधीही काही वैज्ञानिकांनी दावा केला होता की कोरोनाचा प्रसार हा प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून होतोय. पण त्यांच्या हा दावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे नव्हते. नंतर त्या सूक्ष्म द्रव्य कणांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतो असा दावा सीडीसीने केला आहे. या दाव्यासाठी या संशोधानात दहा ओळींचे पुरावे देण्यात आले आहेत.
असा होतो प्रसार: