[ नवी मुंबई ]
बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने चौथे सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताच्या महिला संघाने लॉन बॉल खेळाच्या फायनल इव्हेंटमध्ये दक्षिण अफ्रिकेच्या संघाला १७-१९ ने मात दिली आहे. चौथं सुवर्णपदक जिंकून भारताच्या महिला संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉल खेळात भारताने पहिल्यांदा पदक जिंकलं आहे. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानू,जेरेमी लालरिनुंगा आणि अंचिता शेउली यांनी आतापर्यंत सुवर्णपदक जिंकलं आहे.
दरम्यान,भारतीय महिला लॉन बॉल संघाच्या नेतृत्व करणाऱ्या ३८ वर्षीय लवली चौबे या झारखंडच्या पोलीस दलात हवालदार आहेत. तसेच रुपा रानी तिर्कि या रांचीच्या आहेत. त्या झारखंडच्या क्रीडा विभागात काम करतात. यांच्या व्यतिरिक्त आरके पुरममध्ये क्रीडा शिक्षक राहिलेल्या पिंकी या देखील भारतीय संघाच्या सदस्या आहेत. नयनमोनी सैकिया आसामच्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत. तसेच त्या आसाम राज्यातील वन विभागात काम करतात.