(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गायवाडी बीच येथील ग्रामदेवता असलेल्या श्री चंडिका मंदिरानजीकच्या गायवाडी तलावात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. वैभव दत्ताराम वाळवे,रा. मालगुंड भाटलेवाडी असे या तरुणाचे नाव व पत्ता आहे.
वैभव हा मंगळवारी २ ऑगस्ट रोजी आपली घरची गुरे घेऊन दुपारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गायवाडी समुद्राकडे असलेल्या गायवाडी परिसरात गेला होता .या ठिकाणी आपली गुरे चरवत असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो गायवाडी तलावात आंघोळी करण्यासाठी उतरला.या तलावात आंघोळी करत असताना त्यांने तलावाच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला असता दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो बुडून गायवाडी तलावात तरंगत असल्याचे तलावाच्या नजीकच असलेल्या चायनीज सेंटरचे मालक दत्ताराम गंगाराम आग्रे राहणार मालगुंड जोशीवाडी यांना दिसून आला.
यावेळी त्यांनी ही घटना पाहताच आजूबाजूच्या ग्रामस्थांना कळीत केल्यानंतर ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाले. यावेळी संबंधित तरुण मालगुंड भाटलेवाडी येथील असल्याचे समजताच त्यांनी त्याच्या घरच्या मंडळीना याविषयीची कल्पना दिली त्यानंतर त्याचा मृतदेह संबंधित ग्रामस्थांच्या सहकार्याने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. यावेळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिकृत मृत घोषित केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचा रितसर पंचनामा जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या मालगुंड – गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या वतीने करण्यात आला त्यानंतर संबंधित मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेविषयी अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या गणपतीपुळे- मालगुंड पोलीस दूरक्षेत्राच्या महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल जाधव व पोलीस कॉन्स्टेबल सागर गिरीगोसावी करीत आहेत.
दरम्यान, बुडून मृत्यू झालेल्या आलेल्या वैभव वाळवे यांच्या पश्चात आई व मोठी बहीण असा परिवार आहे त्याच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण मालगुंड भाटलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.