(चिपळूण)
चिपळूण शहरात गेली ७० वर्षे अव्याहतपणे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणान्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शहरातील दहावी उत्तीर्ण आर्थिक दुर्बल व गरजू कुटुंबातील विद्यार्थ्याना उपलब्ध निधीनुसार शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणतर्फे पारंपरिक गणेशोत्सवाचे मूळ स्वरुप जपत एकात्मतेचा हेतू नजरेसमोर ठेवून धार्मिक, समाजोपयोगी, लोकाभिमुख व सांस्कृतिक कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गतच चिपळूण शहर परिसरातील आर्थिक दुर्बल व गरजू कुटुंबातील दहावी परीक्षेत ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्ती करीता आर्थिक दुर्बल व गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यात वेळेत अर्ज सादर करावेत.
विहीत नमुन्यातील अर्जासोबत दहावीचे गुणपत्रक, रेशनकार्ड व उत्पन्नाच्या दाखला यांची झेरॉक्स प्रत जोडावी. या अर्जाचा नमुना शेखर लवेकर ( गौरव ज्वेलर्स, बाजारपेठ) चिपळूण यांच्याकडे उपलब्ध आहे. अर्ज पूर्ण भरल्यावर, त्यावर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणच्या एका सभासदाची शिफारस घेऊन शेखर लवेकर यांच्याकडेच जमा करावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख गुरुवार दि. २५ ऑगस्ट २०२२ आहे. शिष्यवृत्तीच्याबाबतीत मंडळाचा निर्णय अंतिम राहिल.
अधिक माहितीसाठी रमेश चितळे ९६०४८०२४३१, शेखर लवेकर ९८५०९९२८२६, विलास बांद्रे ८८०५९५५२११, रमेश चिपळूणकर ९४२११३४०६०, रमेश बागवे ९९६०११८८०६, सुधीर पोटे ९८२२१२९६४३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचे अध्यक्ष राजाभाऊ पाटणकर, कार्याध्यक्ष रमण डांगे, कार्यवाह नित्यानंद भागवत यांनी केले आहे.