( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी येथील विशेष कारागृहात असलेल्या कैद्यांच्या परिश्रमाला मोठे यश प्राप्त झाले आहे. कारागृहाच्या साडेपाच एकर जमिनीमध्ये कष्टातून भाजीचा मळा फुलवला आहे. या माध्यमातून त्यांनी शासनाला वर्षभरात 15 लाखाचे उत्पन्न मिळवून दिले आहे.
यावर्षी शिक्षा संपत आलेले 12 पक्के कैदी कारागृहात आहेत. त्यांच्या मार्फत शेती, भाजीपाला, हिरवा मटार, दोडका, माठ व अन्य पालेभाज्या आदीचे उत्पादन घेतले. यानंतर त्यांनी कारागृहाच्या कंपाउंडवरच स्टॉल मांडून ताजा भाजीपाली थेट ग्राहकांना विकला. याला प्रतिसादही मिळाला. यातून महिन्याला सुमारे 1 ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळत होते.
न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या कैदी हे पक्के कैदी असतात. या कारागृहात सध्या 7 पक्के कैदी आहेत. त्यांची शिक्षा संपत आलेली आहे. त्यांच्याकडून शेतीची कामे करुन घेतली जातात. यानंतर त्यांची वर्तणूक पाहून त्यांच्या शिक्षेचा कालावधीही कमी केला जातो.