(संगमेश्वर/दिनेश आंब्रे)
अल्पवधीतच लोकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करणाऱ्या कै.चंद्रकांत उर्फ बावाशेठ चव्हाण स्मृतीगंध प्रतिष्ठान लोवले या सामाजिक संस्थेच्या वतीने लोवले येथे रविवार दिनांक २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत १० वी, १२ वीतील गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव समारंभ अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.
यावेळी प्रथम गावातील प्रतिष्ठित महिला यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज व कै.चंद्रकांत चव्हाण यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवर व प्रमुख अतिथी यांचे शाल श्रीफळ पुष्प देऊन प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे संगमेश्वर येथील आय.टी.आय.काँलजचे प्राचार्य रहाटे यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले तर मिलिंद कडवईकर, समुपदेशक यांनी १० वी, १२ वी नंतर पुढे काय ? या विषयाआंतर्ग सखोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर गावातील दहावी, बारावी, व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३५ विदयार्थांना पुष्पगुच्छ सन्मानपत्र, व फोल्डर भेट देवून गौरव करण्यात आला.
त्यानंतर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मनोज जाधव यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल विस्तृत स्वरुपात माहिती दिली, तर अध्यक्षीय भाषणात प्रदिप शिंदे यांनी प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल भाष्यकरून विद्यार्थ्यांनी आपले जीवन समुध्द करावयाचे असेल तर कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे, त्या दुष्टिकोनातुन तुम्ही तयारी करा असे यावेळी आवर्जून सांगितले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या भाषाशैलीत प्रतिष्ठानचे मार्गदर्शन सुरेश पड्ये यांनी केले. तर कार्यक्रमाचा समारोप अर्थातच आभार प्रदर्शन संतोष उर्फ आप्पा जाधव यांनी केले. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, तर संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष सुभाष कदम, कार्यवाह मोहन मोरे, चिटणीस विनय फटकरे, खजिनदार चंद्रकांत बडबे, सभासद मंगेश जाधव यांनी केले. जिवित जाधव, रवि दोरकडे, संजय रहाटे,ओंकार चव्हाण, नागेश चव्हाण, राजा पड्ये, रघुनाथ सोलकर, शेखर लोवलेकर यांनी विशेष सहकार्य केले.