( संगमेश्वर / प्रतिनिधी )
दिवसेंदिवस मोबाईलचा वापर वाढत चालला आहे. तरुण, तरुणीच्या हातात वारंवार ऑनलाईन शॉपिंग, ड्रेस, मटेरियल खरेदी केले जाते. यावेळी ऑनलाईन फसवणूक सुद्धा होते. या फसवणूकीपासून सावध राहण्यासाठी एहसास कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुला – मुलींना संगमेश्वर पोलिसांतर्फे ऑनलाईन फसवणुकीबाबत जनजागृती करण्यात आली. हे मार्गदर्शन शिबिर डॉ.र.दि.गार्डी माध्यमिक विद्यालय, कळंबस्ते, वाडावेसराड या शाळेमध्ये घेण्यात आले.
या शाळेत जाऊन पोलिस अंमलदार सागर मुरुडकर यांनी मुख्याध्यापक प्रमोद दळी, इतर शिक्षक स्टाफ व विद्यार्थी यांची भेट घेऊन एहसास अंतर्गत ऑनलाईन होणारी फसवणुक, एटी.एम.फ्रॉड, फेसबुक, इन्टाग्राम वरील गुन्हे व करिअर मार्गदर्शन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
सायबर गुन्हे मुक्त गाव होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली होती.
या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक टळावी आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये यासाठी जनजागृती करण्यात आली. पोलिसांच्या या एहसास उपक्रमाचे शिक्षकाकडून कौतुक होत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी श्री. प्रमोद मनोहर दळी, श्री. अजित गोपाळ जाधव, श्री. नुरोद्दीन खाजासहेब सौंदलगे, श्री. दिलीप लक्ष्मण तांबे, श्रीमती. प्रियांका प्रमोद दळी, लिपिक -श्री. सुनील राघो मोहिते, मुस्लिम समाज अध्यक्ष – मजीद नेवरेकर आदी उपस्थित होते.