(संगमेश्वर/दिनेश अंब्रे)
संगमेश्वर मधील पागमळा येथे केरळमधील एक तरुण वेडाच सोंग घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. बातम्या फेकून मारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार तो करत होता. रविवारी 24 जुलै रोजी 5.30 वाजण्याच्या सुमारास तर या तरुणाने कहरच केला. तो तरुण थेट चैतन्य डोंगरे यांच्या दुमजली इमारतींच्या टेरेसवर चढला. आजुबाजुचे लोक जमले. आता उडी मारणार की काय अशी सगळ्यांना भीती वाटू लागली.
दरम्यान हा तरुण टेरेसवर जाताना वरून कडी लावून गेला होता. त्यामुळे वरती जाणे अशक्य होते. तिथे आरडाओरडा सुरू झाल्यावर बघ्याची भूमिका घेणाऱ्यांची संख्या वाढली. त्याला खाली येण्यासाठी बऱ्याच प्रकारे विनंती करण्यात आली. पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. शेवटी पोलिसाना बोलवावे लागले. दोन पोलिस या ठिकाणी दाखल झाले आणि पोलिस पाटील राज कोळवणकरही तिथे दाखल झाले.
सारा प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला पुन्हा विनवणी करत ‘तूला कोण काही करणार नाही, पण तू खाली ये.’ अशाप्रकारे सांगण्यात आले. तरीही तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. उलट हातात काचेच्या थंड्याच्या बाॅटल घेवून घाबरवण्याचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. जवळपास तासभर चालेल्या या प्रकारानंतर पोलिस पाटील राज कोळवणकर आणि संजय शिंदे ( असुर्डे) यांनी धैर्य दाखवत शेजारच्या घरावरून टेरेसवर उतरण्याचा प्लॅन केला. त्याप्रमाणे ते टेरेसवर जाण्यासाठी निघाले हे त्या तरुणाने पाहिले आणि त्यांच्या दिशेने तो काचेच्या बाटल्या फेकून मारू लागला. तरीही कोळवणकर टेरेस चढले. वर जाऊन त्याला पकडण्यासाठी जात असताना त्या व्यक्तीने पुन्हा बाॅटल फेकून मारली. ती त्यांनी चुकून पुढे सरसावले. आणि त्याला पकडले. तरीही तो दोघांना हुसकावण्याचा प्रयत्न करत होता. पण कोळवनकर यांनी त्याला जोरदारपणे आवळले. त्यांच्या या साहसाबद्दल कौतुक होत आहे.
यावेळी बच्चू सैतवडेकर, संतोष खातू, दादू कुष्टे, अक्षय शेट्ये, निखिल लोध, ओंकार लोध, आणि दोन पोलिस कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभले.