(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी मिरकरवाडा येथील 5 वर्षीय बालिकेचा उलटया, जुलाबाने मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर येथील सी. पी. आर. रुग्णालयात घडली. आयत मोहम्मद ताईर मस्तान (5 महिने, मिरकरवाडा, वरचामोहल्ला रत्नागिरी) असे बालिकेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयत मोहम्मद ताईर मस्तान या बालिकेला 17 जुलै रोजी सकाळी 11 वा. च्या सुमारास मिरकरवाडा येथील आपल्या घरात उलटया व जुलाब होवू लागले. त्याला लगेचच रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच तिचे 18 जुलै रोजी तीचा मृत्यू झाला अशी माहिती कोल्हापूर येथील डॉ. विजय गावडे रत्नागिरी शहर पोलिसांना दिली.