रत्नागिरी तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटात रुग्णांसाठी कोरोना विलगीकरण कक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 50 बेड उपलब्धआहेत.
या केंद्राचे उद्घाटन जयगड सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या हस्ते झाले. वाटद शिवसेना, जिंदाल उद्योग समूहाकडून ही सेवा देण्यात आली आहे. परिसरातील सर्व डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, कर्मचारी मिळून हे विलगीकरण कक्षातील रुग्णसेवा मोफत देणार आहेत. रुग्णांना जेवण, पौष्टिक नाष्टा व आवश्यक सोयी पुरविण्यात आल्या आहेत.