( सातारा )
कोयना परिसरात मागच्या काही दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान आज दुपारी (दि. 22) 1 वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची चर्चा होती. दरम्यान, कोयना धरण व्यवस्थापनाकडून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. 22) रोजी दुपारी १ वाजता कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरे बसले. हा भूकंप 3 रिष्टर स्केल इतका क्षमतेचा होता. हा भूकंप संपूर्ण कोयना परिसरात जाणवला आहे. या भूकंपाची खोली 9 किलोमीटर इतकी होती. तर या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यातील हेळवाक गावाच्या नैरूत्तेस 7 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती आहे.
या भूकंपापासून कोयना धरणास कोणता धोका नसून या भूकंपाने परिसरात प्रथम दर्शनी कोणतीही वित्त वा जीवित हानी झाली नसल्याचे कोयना व्यवस्थापन विभागाच्या उपकरण उप कळविण्यात आले आहे.