(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील निवळी जयगड मार्गावरील तरवळ येथे मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे. निवळी ते जयगड या मार्गावर सगळ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
दुचाकीस्वार आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. तशी नेहमी या मार्गावरुन जिंदाल कंपनीच्या अवजड वाहनांची वाहतुक होत असते, तसेच इतर वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने यांकडे त्वरित लक्ष देऊन खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे.
तर एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासन याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालुन प्रवाशांना दिलासा द्यावा असे बोलले जात आहे.