( मुंबई )
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघांचे आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चिपळूण आणि महाड शहरात गतवर्षी आलेल्या महापुरासंदर्भात करावयाच्या पूर प्रतिबंधक उपाययोजनांबाबत निवेदन दिले. या निवेदनामध्ये २१ व २२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुरामुळे चिपळूण व महाड शहर संपूर्ण उद्ध्वस्त होऊन मोठ्या प्रमाणावर वित्त तसेच जीवितहानी झाली होती.
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील या नद्यांच्या पूर प्रतिबंधक उपाय योजनांनबाबत केंद्रिय मंत्रालयाला पाठवावयाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्ठी तसेच रायगड जिल्ह्यातील सावित्री व कुंडलिका या नद्यांबाबत करावयाच्या पूर प्रतिबंधक उपाययोजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत आदेश महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांना द्यावेत ही विनंती करण्यात आली आहे.