‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातगृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 6 लाख 54 हजार 634 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले असून यातून 448 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील 153 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 770 पथकांनी तपासणी कामाला सुरुवात केली होती. आता सध्या 1446 पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या अंतर्गत 1 लाख 86 हजार 440 घरांना भेटी देण्यात आल्या यातून एकूण 2 लाख 398 कुटुंबातील 6 लाख 54 हजार 634 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्याशरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे आदी तपासण्यांचा समावेश आहे. या तपासणी दरम्यान 27887 घरे बंद असल्याचे आढळून आली. तर चालण्याच्या तपासणीनंतर 95 पेक्षा खाली गेली अशांची एकूण संख्या 533 इतकी आढळली आहे तर ताप सर्दी खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या 872 इतकी होती.