( गुहागर / प्रतिनिधी )
गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प (आरजीपीपीएल) ला अंजनवेल, रानवी व वेलदूर या 3 ग्रामपंचायतीनी एकूण 4 कोटी 25 लाख 45 हजार 580 रुपयांची नोटीस बजावली आहे. या प्रकल्पाने 2011-2022, 2022-23 या दोन वर्षाचा अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतीचा इमारती व जमीन कर थकवला. पहिली दिलेली 15 दिवसांची मुदत आता संपली असून दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. कर न भरल्यास जप्तीची कार्यवाही सुरु केली जाईल अशी माहिती विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे यांनी दिली.
ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत करवसुली कायद्याप्रमाणे वसुलीची नोटीस बजावण्याची कार्यवाही केली होती. याविरोधात आरजीपीपीएल कंपनीने पंचायत समितीमध्ये अपिल दाखल केले होते. हा दावा 5 महिने सुरु होता. जून महिन्यामध्ये या दाव्याचा निकाल तिन्ही ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला होता. या निकालामध्ये ग्रामपंचायतीने तत्काळ करवसुली करावी असा आदेश गटविकास अधिकार्यांनी दिला.
ग्रामपंचायतीने पहिल्या नोटीसीमध्ये केलेल्या इमारती कराची मागणी
अंजनवेल ग्रामपंचायत2021-22 चा 1 कोटी 53 लाख 78 हजार 311 रुपयांचा, 2022-23 चा 1 कोटी 44 लाख 44 हजार 257 रुपयांचा.
रानवी ग्रामपंचायत 2021-22 चा 38 लाख 53 हजार 435 रु. 2022-23 चा 34 लाख 83 हजार 852 रु.
वेलदूर ग्रामपंचायत 2021-22 चा 37 लाख 69 हजार, 559 रु., 2022-23 चा 36 लाख 16 हजार 416 रु.