(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे सामाजिक शास्त्र मंडळांतर्गत प्रख्यात लोकशाहीर, साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संपदेवर भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले.
प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. थोर विचारवंत ,साहित्यिक व समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा सार भित्तिपत्रकातून विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केला.
अण्णाभाऊ साठे हे भारतीय बहुजन समाज व दलित, शोषित, कष्टकरी साहित्यातील युगस्तंभ होते. एकूणच अण्णाभाऊ साठे यांची साहित्यसंपदा भितीपत्रकातून अध्ययनार्थींनी स्पष्ट केली. या कार्यक्रमाला प्रा. अवनी नागले, सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. कविता जाधव, प्रा. शामल करंडे, प्रा. तेजश्री रेवाळे प्रा दिपाली सावंत व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम प्राचार्या स्नेहा पालये यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.