(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय करबुडे लाजुळ येथे गुरू पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्प देवुन शुभेच्छारूपी वंदन केले. यावेळी घेण्यात आलेल्या सभेचा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यानी गुरू पौर्णिमाविषयी भाषणे करून गुरुजनांचा गौरव केला. विद्यालायातील शिक्षिका जान्हवी जाधव यांनी गुरू पौर्णिमेचे महत्त्व विशेद केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. महेंद्र कुवकेकर यांनी गुरू पौर्णिमा दिनाचे महात्म्य सांगून बहुमोल मार्गदर्शन केले. या दिनानिमित्त पानाफुलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेते ठरलेले खालील प्रमाणे- प्रथम- तनुजा पाचकुडे व सुहानी रामगडे, द्वितीय- सुहानी ओरपे व करीना कळबटे, तृतीय – कुणाल कळबटे व अनिकेत घाणेकर इ.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश पाटोळे यांनी तर आभारप्रदर्शन श्री. गजमल बहिरम यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी सौ. प्रियांका चव्हाण, श्री. बाहुबली नाईक, श्री.अभिजीत जोशी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.