(गुहागर)
गुहागर ग्रामीण रुग्णालयासमोर १० टन साठवणूक क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित झाला आहे. या प्लान्टमध्ये २ टन लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आला असून, कोविड रुग्णांवर उपचारासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालय सज्ज झाले आहे.
सध्या गुहागर तालुक्यात २८ कोविड रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये २५ ऑक्सिजन बेड आहेत. गतवर्षी येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्यात आला. आवश्यकतेनुसार तो सुरू केला जातो. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारामध्ये १० टन क्षमतेचा लिक्विड साठवणूक प्लान्ट उभारून तीन महिने झाले होते. पहिला गॅस टँकर येथे दाखल झाला आहे. २ टन लिक्विड ऑक्सिजन या प्लान्टमध्ये भरण्यात आला. या प्लान्टमधून ऑक्सिजन बेडपर्यंतची पाईपलाईनही पूर्ण झाली आहे. यामुळे आता गुहागर ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.