गुहागर तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र तसेच श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान (पालशेत) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नाना पालकर यांच्या माध्यमातून पालशेत आणि तालुक्यातील इतर गावातील गरजू मुलींना व ज्या मुलींची शिक्षण घेण्याची परिस्थिती नसते, अश्या मुलीचं पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे समाजसेवी कार्य त्यांच्या हातून घडत आहे.
नुकतेच तालुक्यातील वेळंब गावातील जिल्हा परिषद शाळा घाडेवाडी, वचनवाडी, नालेवाडी या शाळांना वेळंब गावचे पोलिस पाटील श्री स्वप्नील तुकाराम बारागोडे यांच्या प्रयत्नांतून आज दिनांक ०९ जुलै २०२२ शनिवार रोजी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नालेवाडीतील ग्रामस्थ श्री शरद पवार, श्री दत्तात्रय वेल्हाळ, श्री राजेश नांदलस्कर, श्री रमेश पवार, तसेच वचन वाडीतील ग्रामस्थ श्री बबन कुंभार, सौ आरवलकर, व शाळांचे व्यवस्थापन समिती सदस्य व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सर्व उपस्थितांच्या वतीने श्री नाना पालकर यांचे आभार मानण्यात आले.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !