(रत्नागिरी)
श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे इथे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या भावी आयुष्यात स्थैर्य निर्माण व्हावे, तो बेकार राहू नये तसेच या सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांची मुले पदवीधर होऊन त्यांनी कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळावा या सदीच्छेतून कॅम्पस इंटरव्ह्यू प्रोग्राम, श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार मोहिते यांनी या विद्यानगरीत निप्रो इंडिया कंपनी पुणे यांच्या माध्यमातून घडवून आणला. त्याचबरोबर करिअर गायडन्स विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले. याचा लाभ सुमारे 92 विद्यार्थ्यांनी घेतला.
या कार्यक्रमासाठी धैर्यशील देसाई (डायरेक्टर ऑफ मेगा कार्पसल पुणे), श्री योगेश चव्हाण (ऑपरेशन मॅनेजर), श्री दिनेश खानविलकर एच ओ डी मेकॅनिकल इंजिनियर डिपार्टमेंट सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे हे इंटरव्यू प्रोग्रामसाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्रमिक किसान सेवा समितीचे उपाध्यक्ष श्री. नारायण आग्रे, सचिव मधुकर थुळ, श्री प्रकाश उर्फ बावाशेठ साळवी उपाध्यक्ष आंबा बागायतदार संघ, तसेच माजी सरपंच गोळप श्री.रमेश आडविरकर सामाजिक कार्यकर्ते पुर्णगड आणि श्री.वसंत आंबेलकर सामाजिक कार्यकर्ते धाऊलवल्ली राजापुर उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्राध्यापकवृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कल्पना मेस्त्री, प्रास्ताविक प्राध्यापिका शालिनी चांदले, स्वागत प्रभारी प्राचार्य,श्री. राकेश आंबेकर व आभार प्राध्यापिका अर्चना चव्हाण यांनी मानले.