( दापोली / प्रतिनिधी )
दापोली तालुक्यातील गुम्हवणे येथील शाळकरी मुलाचा सायकल घसरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 7 जुलै रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास घडली. आर्यन विनोद गौरत (16, गिम्हवणे, दापोली) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आर्यन हा लोकमान्य टिळक हायस्कूलचा विद्यार्थी आहे. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तो सायकलने घरी जात असताना रस्त्यात सायकल स्लीप होऊन तो खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. आर्यन याला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर संदीप गौरत (47, दापोली) यांनी पोलिस स्थानकात दिली.