एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि एकमेव कर्करोग उपचार केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञनाचा वापर करून कर्करोग पीडित रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात येत आहेत.
कॅन्सर पेशंट एड असोसिएशन हि कर्करोग पीडित रुग्णांसाठी साहाय्य करणारी एक नामवंत संस्था असून या संस्थेमार्फत एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल पडवे येथे घश्याच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी शस्त्रक्रिया तसेच सदर रुग्णांसाठी रेडिओथेरपी, केमोथेरपी, डाएट सप्लिमेंट, पोष्ट सर्जरी स्पीच थेरपी, व्हॉइस प्रोस्थेसिस या सेवांसाठी आवश्यक सर्व खर्च सदर संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग सहित शेजारील जिल्ह्यातील नाक, कान आणि घश्याच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांसाठी सदर उपलब्ध सेवा म्हणजे संजीवनीच संबोधली जात आहे. एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटलचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. अरविंद कुडतरकर यांच्या विशेष प्रयत्नातून सदर सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाक, कान आणि घश्याच्या (हेड अँड नेक कँसर) कर्करोगाने पीडित रुग्णांसाठी एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे या ठिकाणी कार्यान्वित झाली आहे. इ.एन.टी. तज्ञ डॉ. ओंकार वेदक आणि कर्करोग तज्ञ डॉ. आदेश पालीयेकर यांच्याकडून सदर शस्त्रक्रिय करण्यात येणार आहेत.
रुग्णांलाय संदर्भीय इतर सर्व माहितीसाठी अरविंद कुडतरकर ९३२५२३२५६२, रुग्णालय रिसेप्शन क्रमांक . ०२३६७-२३४००० / ८२०८३२८११८ / ८२०८३८९२२६ / ९५१८३४१९४२ / ९५१८३०६२२३ सौ. दुर्वा गंगावणे ९३७००५६०७६ किंवा अनिल कुडपकर ९४२०९०७६६१. यांच्याशी संपर्क साधावा.