(नाशिक)
मुस्लिम धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती उर्फ सुफी बाबा हत्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, एक जण सुफी बाबाचा वाहन चालक असून दुसरा सहकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील येवला एमआयडीसी परिसरात एका जमिनीची पूजा करण्यासाठी जायचे असल्याचे सांगून मंगळवारी सायंकाळी सुफीबाबा याला एमआयडीसी परिसरात आणण्यात आले होते. त्या ठिकाणी सुफी ख्याजा उर्फ सुफी बाबा याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, हत्येनंतर मारेकऱ्यानी सुफीबाबा याच्या मोटारीसह तेथून पळ काढला होता.
या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून येवला पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करीत दोन संशयितांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेले दोघांपैकी एक जण सुफी बाबा याच्या वाहनावरील चालक असून दुसरा त्याचा सहकारी असल्याची माहिती पाटील यांनी दिली. प्राथमिक चौकशीवरून ही हत्या संपत्तीच्या वादातून झाली असल्याची दाट शक्यता आहे, मात्र आम्हीच सर्वांगाने तपास करीत असल्याचे पोलीस अधिक्षक पाटील यांनी सांगितले.