(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेची बैठक कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय निरीक्षक गजानन तथा आबा पाटील, केंद्रीय सचिव माधव अंकलगे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत रत्नागिरी शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
यामध्ये रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी सौ. तेजा रवींद्र मुळ्ये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाखेच्या कार्याध्यक्षपदी श्री. चंद्रमोहन देसाई यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शंकर कदम, सचिवपदी सुनील एकनाथ चव्हाण, हुसेन कादर पठाण सहसचिव पदी, खजिनदार पदी विद्याधर लक्ष्मण कांबळे, संजय बाळकृष्ण कुळये सह कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा प्रतिनिधी म्हणून श्री. आनंद शेलार यांची निवड करण्यात आली आहे.
सौ. आकांक्षा आनंद भुर्के महिला प्रमुख, दुर्गेश आखाडे यांची युवा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य पदी सौ. आकांक्षा निगुडकर, मनोजकुमार खानविलकर, राजेंद्र चव्हाण, विजय साळवी यांची निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी शाखेच्या सल्लागार पदी सुभाष भडभडे, प्रमोद कोनकर, राजेंद्रप्रसाद मसुरकर, गणेश गुळवणी, सुनेत्रा जोशी, डॉ. दिलीप पाखरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.